Site icon Kokandarshan

तळवडे येथे आढळलेल्या मगरीची वन विभागाकडून नैसर्गिक अधिवासात यशस्वी मुक्तता…!

सावंतवाडी,दि.१०: तालुक्यातील तळवडे गावातील मिरेस्तीवाडी येथे रमाकांत कुलकर्णी यांच्या घरच्या परिसरात आढळून आलेल्या मगरीची सावंतवाडी वन विभागाच्या कर्मचारी यांनी यशस्वी सुटका करत तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
याबाबत सविस्तर वृतांत असा की, तळवडे येथे मानवी वस्तीजवळ मगर आढळून येत असल्याबाबत वन विभागाला कळाले नुसार सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाचे जलद बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अंदाजे ६ फूट लांबीची मगर श्री. कुलकर्णी यांचे घराच्या परिसरात असल्याचे दिसून आले. सदरची मगर ही श्री. कुलकर्णी यांच्या घराच्या जवळ असलेल्या होडावडा नदीतून अली असण्याची शक्यता दिसून आली. वन विभागाचे कर्मचारी श्री.रामचंद्र रेडकर यांनी तळवडे ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या शिताफीने सदर मगरीला यशस्वीरित्या पकडले. तद्नंतर ती मगर नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी सुदृढ असल्याने तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
सदरची मोहीम ही मा.उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस. नवकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
यावेळी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल विजय पांचाळ, वनरक्षक रमेश पाटील, प्रकाश रानगिरे, वनमजुर रामचंद्र रेडकर तळवडे येथील रहिवासी श्री.बाळा जाधव आणि इतर ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version