Site icon Kokandarshan

सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणाची पाण्याची पातळी खालावली..

शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची व्यक्त होत आहे भीती.. माजी नगराध्यक्ष साळगावकर

सावंतवाडी, दि.०८: येथील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणे कोंड धरणाने तळ गाठल्याने सावंतवाडी शहर वासियांना पाणी प्रश्नावर मोठ्या समस्येला सामोरे जावे लागण्याची भीती येथील माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केली आहे.
ते काल संकष्टी निमित्त श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर पाळणे कोंड येथे गेले असता त्यांनी धरणाची पाहणी केली व तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
काही वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती परंतु १५ जुलै पर्यंत कमी अधिक दाबाने पाणीपुरवठा शहरांमध्ये होत होता. येथील नागरिकांनी घाबरून न जाता पाण्याचा अपव्यय टाळावा जेणेकरून मोठ्या प्रमाणावर पाण्याची समस्या निर्माण होणार नाही असा संदेश माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकामार्फत शहरवासीयांना दिला आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version