Site icon Kokandarshan

मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ प्रयोगशाळा तज्ञ हे पद भरा..

..अन्यथा आंदोलन करू…उपसरपंच हेमंत मराठे

सावंतवाडी,दि.०७: मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ प्रयोगशाळा तज्ञ हे पद भरा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिला आहे.
गेले कित्येक दिवस मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा तज्ञ हे पद रिक्त असल्याने सर्वसामान्य गरीब रुग्णांना आपले रक्ताचे नमुने व अन्य नमुने तपासणीसाठी इतर ठिकाणी खाजगी प्रयोगशाळांमध्ये जावे लागत आहे.तसेच काही वेळा महालॅबकडे पाठवलेले रक्त नमुने त्याच बरोबर इतर नमुन्यांचा रिपोर्ट येण्यासाठी विलंब लागल्याने रुग्णांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी ही वेळ जात आहे.यामुळे मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा तज्ञ हे पद तात्काळ भरा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी आरोग्य विभागाला दिला आहे.तसेच इतर रिक्त पदेही तात्काळ भरावी अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी खलीपे यांच्याकडे मराठे यांनी केली आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version