मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी शहरातील विविध समस्यां बाबत केली चर्चा..
सावंतवाडी,दि.०७: येथील नगरपालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी शहरातील स्वच्छतेबरोबरच मोती तलावातील गाळ उपसा मोहीम लवकरात लवकर मार्गी लावा अशी मागणी केली .श्री साळुंखे यांनीही मनसेच्या पदाधिकार्यांच्या प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद दिला.
श्री साळुंखे यांनी अलीकडेच मुख्याधिकारी म्हणून सावंतवाडी नगरपालिकेमध्ये रुजू झालेत दरम्यान आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत शहरातील विविध प्रश्नांवर लक्ष वेधले यात प्रामुख्याने शहरातील स्वच्छतेच्या विषयावर नियोजन बद्दल काम करण्याची मागणी त्यांनी केली शहरात बऱ्याच ठिकाणी नागरिकांकडून उघड्यावर कचरा टाकला जातो त्यामुळे हा कचरा सर्वत्र पसरून दुर्गंधी पसरते त्यामुळे सदरचा कचरा कचराकुंडीत टाकण्या बाबत तसेच संबंधित परिसरात सीसीटीव्ही बसवून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत मागणी केली शहरात मोठ्या प्रमाणात उघडी गटारे आहेत त्यामध्ये असलेल्या सांडपाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहेत याचा त्रास शरीरातील नागरिकांना जाणवत आहे याबाबत निर्मूलन मोहीम पावसाळ्याआधी हाती घ्यावी तसेच गटारांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी करावी. सध्या पालिकेच्या माध्यमातून मोती तलावातील गाळ उपसा काम युद्धपातळीवर सुरू आहे मात्र हे काम पावसाळ्याच्या तोंडावर सुरू असल्याने येण्याची शक्यता लक्षात घेता अजून यंत्रसामुग्री वाढवून लवकरात लवकर गाळ उपसा करण्यात यावा असे मागणी केली.
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या व मोकाट गुरांची संख्या नेहमीच जाणवते याबाबत पालिकेने उपाययोजना हाती घ्यावी मोकाट गुरांच्या मालकांना पूर्वकल्पना देऊन तंबी द्यावी त्यानंतरही त्यांच्याकडून कुठलाही प्रचार आल्यास दंडात्मक कारवाई हाती घ्यावी अशा विविध मागण्या केल्या श्री साळुंखे यांनीही याबाबत पदाधिकाऱ्यांना सकारात्मकता दर्शवत येणाऱ्या काळात या सर्व समस्या मार्गी लावण्यात चे आश्वासन दिले.
यावेळी माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार माजी उप तालुकाध्यक्ष प्रकाश साटेलकर मा विभागअध्यक्ष मंदार नाईक उपशहर अध्यक्ष प्रवीण गवस ग्रा.प सदस्य नरेश देऊलकर प्रमोद तावडे नीलेश मुळीक विशाल बर्डे गोकुळदास मोठे आदी उपस्थित होते.