Site icon Kokandarshan

फार्मसी अभ्यासक्रमावर उद्या मार्गदर्शन शिबीर

सावंतवाडी, दि.२ : औषध निर्माण क्षेत्रातील करिअरच्या संधी व प्रवेश प्रक्रिया यासंबंधीचे मार्गदर्शन शिबीर शनिवार ३ जून रोजी सकाळी १०.३० वाजता यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयोजित करण्यात आले आहे. यावेळी प्राचार्य डॉ. विजय जगताप उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. समाजात फार्मसी क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत आणि त्या संबंधीची नेमकी माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. फार्मसी प्रवेश प्रक्रिया ही महाराष्ट्र शासन ऑनलाईन पद्धतीने राबविते. या प्रक्रियेचे विविध टप्पे व प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजने सावंतवाडी बस स्थानकाजवळून स्कूलबसची सोय उपलब्ध केली आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version