अर्चना घारे यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..
सावंतवाडी, दि.३०: तालुक्यातील कोनशी येथील मुलीला त्यांच्याच गावातील युवकाने विनयभंग करून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेतील आरोपींला कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अश्या आशयाचे निवेदन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर यांना देण्यात आले.
या प्रकरणातील दोषी बाबलो शंकर वरक यांस पोलीसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली व न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. याबाबत मौजे कोणाशी परिसरातील सर्व महिला व ग्रामस्थांची विनंती आहे की, दोषी बाबलो शंकर वरक यांस
जामीन मंजूर होउ नये. यासाठी व संबंधित नराधमास कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपल्या स्थरावरुन प्रयत्न व्हावेत व सदर पिडीत युवतीस न्याय मिळावा, अशी विनंती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर यांना करण्यात आली आहे.
दरम्यान” या प्रकरणात मी स्वतः जातीने लक्ष घालेन. आपण पीडित युवतीला न्याय मिळवून देऊ “. असे सांगून सौ. रुपालीताई चाकणकर यांनी शिष्टमंडळाला आश्वस्थ केले. लागलीच त्यांनी पोलीस अधीक्षक श्री. अगरवाल यांना फोन करून विशेष लक्ष देण्याच्या सुचना केल्या.
यावेळी सौ.अर्चना घारे, पुंडलिक दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते .