Site icon Kokandarshan

मळेवाड कोंडूरे गावासाठी कायमस्वरूपी तलाठी द्या…

अन्यथा आपल्या कार्यालयासमोर ग्रामस्थ व शेतकऱ्यांसमवेत उपोषण छेडणार…उपसरपंच हेमंत मराठे.

सावंतवाडी,दि.३०: मळेवाड कोंडूरे गावासाठी कायमस्वरूपी तलाठी द्याव्या अशी मागणी मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी केली आहे.
मळेवाड कोंडुरे गावासाठी गेली दीड वर्षे हून अधिक काळ कायमस्वरूपी तलाठी नसल्याने या ठिकाणी शेतकरी,विद्यार्थी व जमीनदार याना त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे मळेवाड कोंडुरे गावासाठी लवकरात लवकर कायमस्वरूपी तलाठी रुजू करावा.अशी मागणी सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्याकडे मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी निवेदन देऊन केली आहे.मागणीचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर ग्रामस्थ व शेतकऱ्यांसमवेत उपोषण छेडण्यात येईल असाही इशारा मराठे यांनी प्रांताधिकारी यांना दिला आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version