सावंतवाडी,दि.२७: निगुडे गावठाणवाडी रस्ता गेले अनेक वर्ष खड्डेमय होता. निगुडे गावचे माजी सरपंच समीर गावडे यांनी सातत्याने पाठपुरावा करत सदर रस्त्यासाठी निधीची मागणी केली होती. शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांनी तात्काळ दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री श्री. दीपक केसरकर यांच्या निधीतून सदर रस्ता मंजूर करून आणला हा रस्ता आज नागरिकांसाठी खुला करण्यात आला . श्रीफळ फोडून सदर रस्त्याचे उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते उपस्थितीना मार्गदर्शन करत असताना म्हणाले उर्वरित राहिलेला रस्ता मंजूर असून त्याचे काम लवकरात हाती घेण्यात येईल. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री श्री. दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून निगुडे- सोनुर्ली मुख्य रस्ता, निगुडे कासकरटेंब असे अनेक रस्ते यावर्षी पूर्णतत्त्वास आले,.खरं सांगायचं तर निगुडे माजी सरपंच समीर गावडे व माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी सतत पाठपुरावा केला. आम्ही कधीही ते कुठच्या पक्षाचे आहेत हे न बघता शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच आपल्या गावचा विकास शक्य झाला. आणि यासाठी शिक्षण मंत्री श्री दीपकभाई केसरकर यांनी मोठ्या प्रमाणात या गावासाठी निधी दिला असून असुन अनेक विकास कामे शिवसेना भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून करण्यात येतील तसेच जी कामे प्रलंबित आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी उपस्थितत्यांना दिले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निगुडे माजी सरपंच समीर गावडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी मानले. यावेळी शिवसेना शाखाप्रमुख सिद्धिविनायक गावडे, शिवसेना विभाग प्रमुख राजन परब, निगुडे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र गावडे, साक्षी सुधीर गावडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजेश मयेकर, गौरेश गावडे, प्रकाश मयेकर, विलास सावंत, सुहास गावडे, राजन निगुडकर, प्रदीप मयेकर, दादू म्हाडगुत, साहिल आंबेकर, पलक मयेकर, गौरवी गावडे, खुशी गवंडे आधी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निगुडे- गावठाणवाडी रस्त्याचे शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या हस्ते उद्घाटन
