Site icon Kokandarshan

Ind vs Ban: भारत-बांगलादेश मॅचवर पावसाचं संकट, टीम इंडियाचं काय होणार?

Ind vs Ban: अ‍ॅडलेडमध्ये मंगळवारी मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मॅचदिवशी म्हणजे बुधवारीही कमी अधिक प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत सामना पूर्ण झाला नाही तर दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जाईल.

अ‍ॅडलेड, 31 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पुढचा सामना बांगलादेशशी होणार आहे. बुधवारी अ‍ॅडलेडमध्ये हा सामना खेळवला जाईल. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे याही मॅचवर पावसाचं सावट आहे. पण ही बाब टीम इंडियासाठी चिंतेची ठरु शकते. कारण सेमी फायनलच्या दृष्टीनं बांगलादेशविरुद्ध कशाही परिस्थितीत भारतीय संघाला विजय मिळवणं गरजेचं आहे. भारतानं याआधी पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्ध विजय मिळवला असून पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मात्र पराभव स्वीकारावा लागला होता.

अ‍ॅडलेडमध्ये काय परिस्थिती?

अ‍ॅडलेडमध्ये मंगळवारी मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मॅचदिवशी म्हणजे बुधवारीही कमी अधिक प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत सामना पूर्ण झाला नाही तर दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जाईल. पण त्याने पॉईंट टेबलमध्ये काही बदल होईल का?

Exit mobile version