निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांच्याकडे पाण्याची केली मागणी
सावंतवाडी,दि.१८: गेले अनेक दिवस निगुडे रोनापाल इन्सुली या ठिकाणी तिलारी कालव्याचे पाणी नसल्यामुळे विहीर, ओहोळ पाणीटंचाई होत होती बांदा कालव्यात तिलारीचे पाणी दोन दिवसापूर्वी सोडल्यामुळे निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे चर्चा केली असता त्या चर्चेअंती येत्या रविवार पर्यंत रोनापाल कि.मी.४२ पर्यंत पाणी सोडण्याचे आश्वासन त्यांनी दिले त्यामुळे आपण निश्चिंत रहा पूर्ण क्षमतेने कालव्यामध्ये पाणी सोडण्यात येईल हे पाणी पाऊस पडेपर्यंत चालूच राहील त्यामुळे ग्रामस्थांची व आपली मागणी आम्ही लवकरात लवकर विचारात घेऊ असे आश्वासन दिले.