Site icon Kokandarshan

जर्मनीतील म्युनिक येथील महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना आले गौरविण्यात…

सावंतवाडी,दि.१७ : मराठी भाषेची जपणूक व संवर्धन यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. त्याचा भाग म्हणूनच मुंबईत भव्य मराठी भाषा भवन उभे राहत आहे, अशी माहिती मराठी भाषा व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांच्या स्मृती जपत असतानाच मातृभाषेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहवे, असे आवाहनही त्यांनी केले.’कौशल्यविकास, कुशल कामगारांना जर्मनीत रोजगाराची संधी’ या महत्वाच्या विषयावर जर्मन सरकारशी चर्चा करून ठोस पावले उचलण्यात येणार असल्याचे मत ही त्यांनी यावेळी मांडले.
मंत्री केसरकर हे मागील तीन दिवसापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत.मंगळवारी त्यांनी म्युनिक येथील महाराष्ट्र मंडळाने त्यांच्याशी अनौपचारिक संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व बहुसंख्य सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजऱ्या करणाऱ्या महाराष्ट्र मंडळाने शिवराज्याभिषेकाचा त्रिशतको सुवर्णमहोत्सव दिन येत्या ११ जून रोजी साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यात महाराष्ट्रातील निवडक वीस गड-किल्ल्यांची माहिती देणारे प्रदर्शन असेल. त्या प्रदर्शनाची चुणूक दाखविणान्या ‘ट्रीजर’ चा शुभारंभ मंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, आपण मराठी भाषामंत्री झाल्यावर दक्षिण मुंबईत भव्य मराठी भाषा भवन उभे राहत आहे. त्याच्या उपकेंद्राचे काम नवी मुंबईत होईल. मुंबईत येणाऱ्या साहित्यिकांच्या निवासाची व्यवस्था या उपकेंद्रात होईल. मराठी भाषा, साहित्य, साहित्यिक यांच्यासाठी सतत काही करण्याची सरकारची इच्छाशक्ती आहे. परदेशात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यांना भराठी भाषा, संस्कृती आणि इतिहास जपण्यासाठी काय करता येईल, या मुद्दयांवरही मंत्री केसरकर यांनी भर दिला.

Exit mobile version