सावंतवाडी, दि.१३: येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परिचारिका दिवस साजरा करण्यात आला. परिचारिकांना गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन येथील रुग्णालयातील परिचारिकांचा मनसेच्या वतीने सन्मान करण्यात आला, व त्यांच्या हातून घडत असलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार शुभम सावंत अमेय मोरे प्रमोद तावडे अमेय टेमकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सावंतवाडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परिचारिका दिवस साजरा
