सिंधुदुर्ग,दि.१०: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग मार्फत शालेय विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या युवक युवतींसाठी ऑनलाइन वेदिक गणित कार्यशाळेचे दिनांक १० मे २०२३ ते १३ मे २०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यशाळेचे दिनांक १० मे २०२३ रोजी सायंकाळी ठीक ५.०० वाजता उद्घाटन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे संस्थापक माननीय आमदार श्री संजयजी केळकर साहेब यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याध्यक्ष श्री राजेशजी सुर्वे, राज्य संपर्कप्रमुख श्री राजेंद्र नांद्रे तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्य कार्यकारिणी, कोकण विभाग कार्यकारिणी, सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेत श्रीमती विधी वैभव मुद्राळे मार्गदर्शन करणार आहेत. तरी या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ९८६०२५२८२५, ९४२२२६३८०२ या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष गणेश नाईक यांनी केले आहे.