Site icon Kokandarshan

केंद्र शाळा माडखोल नं १ येथे वार्षिक गुणगौरव सोहळा थाटात संपन्न..

सावंतवाडी, दि.०२: तालुक्यातील माडखोल येथील केंद्र शाळा नं.०१ चा सोमवार दिनांक ०१ मे २०२३ रोजी वार्षिक गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणुन माजी सैनिक सहदेव राऊळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम सकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आजगावकर मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम झाला नंतर लगेचच माडखोल नंबर एक केंद्रशाळा ते फौजदारवाडी अंगणवाडी पर्यंत यशस्वी विद्यार्थ्यांसाठी भव्य प्रभात फेरी मिरवणूक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय राऊळ यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. मिरवणूक पार पाडल्यानंतर प्रत्यक्ष नऊ वाजता विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला सुरुवात झाली सर्व मान्यवर पालक विद्यार्थी यांचे एक एक आध्यात्मिक पुस्तक देऊन तसेच गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले दीप प्रज्वलन करुन अध्यक्ष सहदेव राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले तर शारदा मातेला पुष्पहार शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष आनंद राऊळ यांनी अर्पण केला. यावेळी मुख्यद्यापिका आजगावकर मॅडम यांनी प्रास्ताविक केले.
दरम्यान केंद्र स्तर ते जिल्हास्तरापर्यंत यश मिळवणाऱ्या खेळाडूंचे एसटीएस बीडीएस एपीजे अब्दुल कलाम या स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित विद्यार्थी पालक मान्यवरांनी अत्यंत मार्मिक शब्दात मनोगते व्यक्त केली नंतर मराठी शाळेची आवश्यकता या विषयावर खानोलकर मॅडम यांनी विचार मांडले. सुरेश आडेलकर श्री विजय राऊळ रामचंद्र वालावलकर, केंद्रप्रमुख यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच शाळेचे पदवीधर शिक्षक प्रवीण ठाकूर यांची देवसु येथे बदली झाल्याने त्यांच्या कार्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास माजी सैनिक सहदेव राऊळ, शाळा कमिटी विजय राऊळ, उपाध्यक्ष विजया राऊळ, अशोक सावंत, रामचंद्र पोटे, संदीप ठाकूर, जानवी कृष्णा राऊळ, ग्रामपंचायत सदस्य विजय राऊळ, ग्रामपंचायत सदस्य सरिता राऊळ, साक्षी मोरजकर, पूर्वा ठाकूर, संतोष राऊळ, संजीवनी राऊळ, शर्मिला म्हालटकर, विनंती म्हालटकर, अनुजा माडखोलकर, अश्विनी म्हालटकर, प्रियंका, यशवंत सुचिता राऊळ, पांडुरंग राऊळ, विजय राऊळ, सुमन शिंदे, अनिता राऊळ, जोशना राऊळ, अश्विनी म्हाडगुत, सुनील केसरकर, सुरेश आडेलकर, अजित होडावडेकर, लक्ष्मण देवणे, मोतीराम ठाकूर, संदीप ठाकूर, रामचंद्र पोटे, असे अनेक पालक शिक्षण प्रेमी सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन ठाकूर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन पंडित सर यांनी केले.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version