सावंतवाडी,दि.२७: ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मित्र मंडळ मळेवाड कोंडूरे यांच्या वतीने ३० एप्रिल ते ०४ मे या कालावधीत मळेवाड येथे मळेवाड पर्यटन महोत्सव २०२३ चे आयोजन केले आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे च्या सहकार्याने व युवा मित्र मित्र मंडळ मळेवाड कोंडूरे आयोजित ३० एप्रिल ते ४ मे २०२३ या कालावधीत भव्य सांस्कृतिक पर्यटन महोत्सव २०२३ चे आयोजन केले आहे.या महोत्सवाच्या पहिला दिवशी ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९ वा.
श्री गणेश मूर्तीवर अभिषेक व धार्मिक कार्यक्रम
सकाळी १० वा. – श्री सत्यनारायण महापूजा,रात्रौ ०७:३० वा हेळेकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग मायासंग्राम
दुसरा दिवस १ मे २०२३ रोजी सकाळी ०८:३० वाजता
मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे, युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे,संत समाज मळेवाड व सावंतवाडी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबिर,रात्रौ ०७:३० वा. – केशव खांबल प्रस्तुत श्री सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ, दोडामार्ग यांचा नाट्यप्रयोग शापमुक्त तिसरा दिवस २ मे २०२३ रोजी
रात्रौ ०९:०० वा. सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ.रात्रौ ०९:३० वा. – गाव मर्यादित रेकॉर्ड डान्स व वेशभूषा स्पर्धा,तसेच जिल्हास्तरीय निमंत्रित रेकॉर्ड डान्स स्पर्धा,चौथा दिवस ३ मे २०२३ रोजी रात्रौ ०९:३० वा. – वैभवी क्रिएशन, डिचोली (गोवा) निर्मित आणि अमर फाळकर प्रस्तुत दोन अंकी धमाल विनोदी नाट्यप्रयोग माझ्या मित्राची बायको तर पाचवा दिवस ४ मे २०२३ रोजी
रात्रौ ०९:३० वा.सिंधु सुंदरी २०२३ सौंदर्य स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.तरी सर्व रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच सौ मिलन पार्सेकर व उपसरपंच तथा युवा युवा मित्र मंडळ अध्यक्ष हेमंत मराठे तसेच ग्रामपंचायत सदस्य,युवा मित्र मंडळ पदाधिकारी यांनी केले आहे.
मळेवाड येथे ३० एप्रिल ते ४ “मे” दरम्यान मळेवाड पर्यटन महोत्सवाचे आयोजन…

