Site icon Kokandarshan

जिल्हा क्रिकेट समालोचक संघटना अध्यक्षपदी शाम वाककर तर सचिवपदी जय भोसले…

सिंधुदुर्ग,दि.२६: क्रिकेटच्या मैदानावर आपल्या मधुर आणि जबरदस्त आवाजाने सामन्यांचे धावते वर्णन करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेट समालोचकांनी एकत्र सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट कॉमेंट्रेटर असोसिएशनची स्थापना केली.क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्या जन्मदिवसाच्या औचित्यावर ही संघटना स्थापन करण्यात आली.या संघटनेच्या अध्यक्षपदी मालवण तालुक्यातील शाम वाककर यांची तर सचिवपदी बांदा येथील जय भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदी अमोल जमदाडे(कणकवली) आणि समीर चिरमुरे(दोडामार्ग) यांची निवड सर्वानुमते निवड करण्यात आली.
कणकवली येथे झालेल्या या बैठकीला जिल्ह्यातील प्रसिद्ध समालोचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला अमोल जमदाडे यांनी प्रास्ताविकात संघटना बांधणी व स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला.तर बादल चौधरी यांनी संघटने बाबत नियमावली आणि इतर नियमांची माहिती दिली.त्यानंतर समालोचक राजा सामंत आणि विवेक परब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.अध्यक्ष म्हणून शाम वाककर,सचिव जय भोसले, उपाध्यक्ष समीर चिरमुरे, अमोल जमदाडे,खजिनदार राजा सामंत,सहसचिव उत्तम मुणगेकर, सहखजिनदार जयेश परब यांची तर सदस्यपदी प्रदीप देऊलकर,सिद्धेश परब,राजन सांगेलकर, समीर राणे यांची निवड करण्यात आली.तर सल्लागार म्हणून बादल चौधरी, समीर पांढरे,अशोक नाईक,उमेश परब,रमेश वालावलकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी शाम वाक्कर,बादल चौधरी,जय भोसले,जयेश परब,रोहन कदम,पुंडलिक तोंडवळकर,अमोल जमदाडे,प्रसाद चाळके,सागर कदम,प्रदिप देवुलकर,नाना नाईक,रमेश वालावलकर,योगेश मेस्त्री,प्रणव ठाकुर,प्रविण ठाकूर
राजा सामंत,गुरुप्रसाद चिटणीस,राजन सांगेलकर
निखिल भर्तु,सुमेध काळसेकर
समीर राणे,समीर चिरमुरे,सिद्धू परब,महेश डोंगरे,विवेक परब,उत्तम मुणगेकर,उमेश परब आदी उपस्थित होते.
या पहिल्या सभेत संघटनेच्या अधिकृत जर्सीचे अनावरण करण्यात आले

Exit mobile version