कुडाळ ,दि.२५: खरारे पेंडुर येथील ऐतिहासिक वेताळगडावरील विहिर व पाण्याच्या टाकीची स्वच्छता दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत करण्यात आली.
गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या वेताळ गडावरील विहिरवजा पाण्याच्या टाक्या झाडा झुडुपांनी गच्च झालेल्या होत्या. आपला ऐतिहासिक वारसा जपण्याच्या हेतूने वेताळगडावरील मध्यावर असलेल्या एका विहिरीची स्वच्छता दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत करण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेला गणेश नाईक, समिल नाईक, पंकज गावडे, सच्चिदानंद राऊळ, शितल नाईक, उत्कर्षा वेंगुर्लेकर, वेदांत वेंगुर्लेकर, यश पेंडुरकर, प्रिया पेंडुरकर, मंजिरी पेंडुरकर, ईशा सावंत, अनिकेत गावडे इत्यादी उपस्थित होते. या स्वच्छता मोहिमेसाठी उपस्थितांना तन्वी गावडे व उत्कर्षा वेंगुर्लेकर यांनी अल्पोपहाराची सोय केली.
या पाण्याच्या टाकीचे उर्वरित संवर्धन तसेच इतर पाण्याच्या टाक्यांचे आणि वास्तूंचे संवर्धन कार्य आणि आवश्यक ठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्याचे काम दुर्ग मावळा परिवारातर्फे लवकरच हाती घेण्यात येणार आहे.