Site icon Kokandarshan

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाकडून शिरशिंगे नं १ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता सोनटक्के यांचा सन्मान..

माजी उपसरपंच श्री पांडुरंग राऊळ व माजी सरपंच श्री सुरेश शिर्के यांनी केले अभिनंदन..

सावंतवाडी, दि.२५: अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्याकडून जि.प.पू. प्राथमिक शाळा शिरशिंगे नंबर(१) एकच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनटक्के मॅडम यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले.
श्रीमती सोनटक्के यांनी आपली सेवा बजावत असताना शैक्षणिक क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देऊन क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व आपल्या शाळेचे नाव तालुका, जिल्हा व महाराष्ट्र राज्यात उज्वल केल्याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला.
त्यांनी घेतलेली ही मेहनत आणि शाळा व गावाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात नेल्याबद्दल गावचे माजी उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री पांडुरंग राऊळ व माजी सरपंच श्री सुरेश शिर्के यांनी सोनटक्के मॅडम यांचे अभिनंदन केले आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version