Site icon Kokandarshan

.. तो प्रलंबित २५ कोटी चा प्रकल्प हवाहवाई पाहणी करणाऱ्या शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांना दिसत नाही का..?

आंबोली येथील पर्यटन विकास महामंडळाचा सुमारे २५ कोटी चा घोटाळा.. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा आरोप

सावंतवाडी,दि.२५ : आंबोलीच्या प्राईम लोकेशन वरती सतरा वर्षा पूर्वी उभा राहिलेला पर्यटन विकास महामंडळाचा तो प्रकल्प अध्याप उद्घाटना विना सडत पडलेला आहे याच्यावरती कोट्यावधी रुपयाचा खर्च झाला आहे पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी डोळ्याला झापड लावून गप्प का बसले आहेत..? या प्रकल्पामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून एक रेस्टॉरंट एक ओपन रेस्टॉरंट शॉपिंग ऑर्किड दोन मोठ्या लॉजिंगच्या इमारती प्रशस्त पार्किंग गार्डन ओपन प्लेस अशा अद्यावत सर्व सुविधा आहेत या प्रकल्पाची सखोल चौकशी सिंधुदुर्ग चे पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांनी या प्रकल्पाला भेट देऊन सखोल चौकशी करावी आम्ही काही प्रश्न उपस्थित करतो एक हा प्रकल्प शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांच्या मतदारसंघांमध्ये येतो सातत्याने पर्यटना च्या वाल्गना करणाऱ्या मंत्र्यांनी या प्रकल्पाकडे दुर्लक्ष का केला..? प्रकल्पावरती स्वतः दीपक भाई केसरकर यांनी प्रकल्पाचे नूतनीकरण दोन वेळा स्वतःच्या देखरेखी खाली केलेले आहे, नूतनीकरण करत असताना अनेक प्रकल्पातील अंतर्गत तोडफोड केलेली आहे याचं टेंडर त्या काळामध्ये झालं होतं हे टेंडर कोणी घेतलं याची चौकशी व्हायला हवी सतरा वर्षे उद्घाटना विना हा प्रकल्प ज्या ज्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केला त्यांच्यावरती कारवाई व्हायला हवी, आमच्या माहितीप्रमाणे याचं टेंडर झालं होतं त्याची पूर्तता अंतिम का करण्यात आली नाही याची चौकशी व्हावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तात्काळ या प्रकल्पाला भेट देऊन याची माहिती जनतेसाठी द्यावी भ्रष्ट मार्गाने हा प्रकल्प सोडवला गेला असेल यात आर्थिक घोटाळ्याची चौकशी पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.

Exit mobile version