सिंधुदुर्ग,दि.२४: सिंधुदुर्ग जिल्हा खरेदी – विक्री संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व्हिक्टरजी डान्टस यांच्या निवासस्थानी सौ.अर्चना घारे यांनी भेट देत अभिनंदन केले.
यावेळी बोलताना अर्चना घारे म्हणाल्या की, एकीकडे कोकणातील सहकार क्षेत्राला घर -घर लागलेली असताना, सिंधुदुर्ग जिल्हा खरेदी विक्री संघावर या पूर्वी देखील काम करताना व्हिक्टरजी डान्टस यांनी संघ नफ्यात आणण्यासाठी खुप मेहनत घेतली. तळकोकण परिसरातील शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून त्यांना खते बी बियाणे संघाचा मार्फत उपलब्ध करून दिली तसेच त्यांच्याकडून तयार झालेला माल विकत घेत त्यांना चांगला भाव मिळेल याची काळजी त्यांनी घेतली. याचाच परिणाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा खरेदी विक्री संघाकडे शेतकऱ्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलून ही संस्था शेतकऱ्यांच्या हक्काचे ठिकाण बनली कुठली.
“सहकारी संस्था चालवत असताना सहकारात राजकारण नको, सहकारात सहकार्याच्या भावनेने सर्व सभासदांचे हित पाहत काम करण्याची गरज असते”, हे व्हिक्टरजी डान्टस आवर्जून सांगतात. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा खरेदी – विक्री संघास व परिसरातील शेतकऱ्यांना होत आहे, या पुढील काळात देखील कोकणातील शेतकऱ्यांसाठी त्यांच्या हातून दर्जेदार काम होवो, या सदिच्छा मी या भेटीच्या निमित्ताने त्यांना देते” .
या भेटीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री.पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी, अल्पसंख्याक सेलचे हिदायत खान, राकेश नेवगी, बावतीस फर्नांडिस, इफ्तेकार राजगुरू,
आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा खरेदी – विक्री संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व्हिक्टरजी डान्टस यांचे सौ.अर्चना घारे यांनी केले अभिनंदन…
