दीपेश शिंदेसह गुरू तुळसकरचा यांचा सन्मान;राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक
सिंधुदुर्ग,दि.२३: उस्मानाबाद जेवळी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत सावंतवाडी येथिल नृत्य कलाकार दिपेश शिंदे व प्रणाली कासले यांच्या लावण्याखणी ग्रुपला राज्यात तिसरा क्रमांक मिळाला आहे तर तुळस येथिल गुरू तुळसकर याला ही यश मिळाले आहे.
महात्मा बसवेश्वर यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने या राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यासाठी सावंतवाडीतून तब्बल पंचविस कलाकार या नृत्य महोत्सवात सहभागी झाले होते यात श्री शिंदे यांच्या ग्रुपने बाजी मारली आहे.