निरवडे येथील श्री देव भूतनाथ कला क्रीडा मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..
सावंतवाडी,दि.२१: तालुक्यातील निरवडे भूतनाथ देवस्थान च्या वतीने श्री देव भूतनाथ कला क्रीडा मंडळ यांनी मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यामध्ये लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा,गायन स्पर्धा तसेच महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते.
महिलांसाठी घेण्यात आलेली होम मिनिस्टर स्पर्धा खूपच रंगतदार झाली या स्पर्धेत सौ. चैताली नयनेश गावडे यांनी चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक घेत पैठणी आपल्या नावे केली.तर सौ. संजना संतोष गावडे व सौ. आकांक्षा विनय गावडे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.
या सर्व विजेत्यांना निरवडे गावच्या सरपंच सौ.सुहानी सुहास गावडे व माजी सभापती सौ. प्रियंका प्रमोद गावडे यांच्या हस्ते पैठणी देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी निवेदन शुभम धुरी यांनी केले.
या दरम्यान घेण्यात आलेल्या गायन स्पर्धेत शुभम सचिन गावडे यांनी प्रथम, सुजल गावडे द्वितीय तर अभिषेक मेस्त्री तृतीया अशी पारितोषिके पटकाविली.
यावेळी बोलताना निरवडे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री नयनेश गावडे यांनी आपल्या गावातील लहान मुले, महिला यांच्यामध्ये विविध कला गुण असतात मात्र त्यांना ते दर्शवण्यासाठी एक कलामंच (प्लॅटफॉर्म) हवा असतो आणि तो आम्ही या मंडळाच्या माध्यमातून दिला. भविष्यात देखील असे विविध कार्यक्रम घेणार असे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब, प्रथमेश तेली, बंड्या परब, मळगाव सरपंच हनुमान पेडणेकर,सोनुर्ली सरपंच बाबल हिराप,प्रमोद गावडे, नयनेश गावडे, निखिल माळकर, शुभम धुरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.