Site icon Kokandarshan

राष्ट्रीय फुटबॉल संघामध्ये निवड झालेल्या रोशन सावंत यांचा मनसेच्या वतीने सत्कार..

सावंतवाडी,दि.१९ : तालुक्यातील ओवळीये गावातून राष्ट्रीय फुटबॉल संघामध्ये निवड झालेल्या रोशन सावंत यांचा मनसेचे सरचिटणीस संदीप दळवी माजी संपर्क अध्यक्ष महेश परब यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दील्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सरचिटणीस श्री दळवी यांनी ग्वाही दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी तालुक्याची बैठक काल आयोजित करण्यात आली होती यादरम्यान फुटबॉलपटू कु.रोशन सावंत यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याने मनसेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब माजी उपजिल्हाध्यक्ष अनिल केसरकर अतुल केसरकर संतोष भैरवकर प्रकाश साटेलकर सुधीर राऊळ मिलिंद सावंत सुनील आसवेकर नरेश देऊलकर विष्णू वसकर प्रवीण गवस प्रमोद तावडे मंदार परब बापू राऊळ आदी मनसेचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत.

Exit mobile version