Site icon Kokandarshan

सावंतवाडी खरेदी-विक्री संघाच्या निवडणूक प्रचाराचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ..


सावंतवाडी,०३ : कोकणातील शेतकरी हा नियमित कर्ज परतफेड करत असतो त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने या शेतकऱ्यांला प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे आश्वासन अधिवेशनात देऊनही एक दमडीही दिली नाही पण उलट महाराष्ट्रात शिंदे सरकार सत्तेवर येताच शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर  अनुदान प्राप्त करून देत आश्वासन पूर्ती केली तसेच निर्णय खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत घेऊ असे आश्वासन भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी दिले.
सावंतवाडी खरेदी-विक्री संघाच्या निवडणूकीचा प्रचाराचा शुभारंभ येथील श्री पाटेकर मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी लखम भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग, माजी नगराध्यक्ष संजू परब,अशोक दळवी, जिल्हा बँक संचालक गजानन गावडे, रवी मडगावकर, माजी संचालक गुरुनाथ पेडणेकर, प्रमोद कामत, भाजपचे सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, दोडामार्ग मंडल अध्यक्ष सुधीर दळवी, एकनाथ नाडकर्णी, दत्ताराम कोळंबेकर, सुधीर आडिवरेकर,दादू कविटकर उपस्थित होते.
राणे म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत असंख्य महत्वाच्या योजना राबविल्या आहेत.  रोजगार उपलब्ध करून दिले आहेत केंद्रातील सरकारने मागील आठ वर्षात शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना जाहीर करून अनेक  निर्णय वेळोवेळी घेतले आहेत.
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या कोकणातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान म्हणून प्रत्येकी ५० हजार रुपये प्राप्त करून दिले. त्यामुळे भविष्यात सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघातर्फ केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा बँक यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून शेतकऱ्यांचे हित साधण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
खरेदी-विक्री संघाच्या निवडणूकीत सहकाराच्या मुद्द्यावर एकत्र आलो आहोत. वरिष्टांनी दिलेल्या आदेशाचे आम्ही पालन केले आहे यापुढे जसे आदेश मिळतील तसा आमचा पुढचा प्रवास असेल, महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांसाठी विविध घोषणा केल्या. परंतु कोणत्याही घोषणा प्रत्यक्षात आल्या नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने कायम लोकांची फसवणूक केली आहे.
हे आता लोकांच्या लक्षात आल्याचा आरोप ही आमदार राणे यांनी केला.
यावेळी माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो,अशोक दळवी आदिनी विचार मांडले तर पॅनल प्रमुख महेश सारंग यांनी आमदार राणे यांचे स्वागत केले.

Exit mobile version