Site icon Kokandarshan

ओटवणे येथील शेतात आग लागलेल्या गावकर कुटुंबियांना अर्चना घारे यांचा मदतीचा हात..

सावंतवाडी,दि.१५ : तालुक्यातील ओटवणे येथील शेतात आग लागल्याने गावकर कुटुंबियांच्या झालेल्या नुकसानीची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ.अर्चना घारे यांनी पाहणी केली.

“मोठ्या कष्टाने गावकर कुटुंबीयांनी उभी केलेल्या शेतीचे झालेले नुकसान वेदनादायक आहे. शेतीसह त्यांच्या गोठ्याचे व साठवलेल्या चाऱ्याचे नुकसान देखील नुकसान झाले. सुदैवाने गाई चरायला शेतात गेल्याने अनर्थ टळला असला तरी झालेले नुकसान मोठे आहे.या नुकसानीत शासन मदत करेल तेव्हा करेल पण आज तात्पुरत्या स्वरूपात मी काही मदत करत असून या संकटात आम्ही सर्व गावकर कुटुंबियांच्या सोबत आहोत.या संकटातून मार्ग काढत ते पुन्हा एकदा या. शेतात नंदनवन फुलवतील” , असा विश्वास सौ.अर्चना घारे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
या भेटी दरम्यान सौ. सुवर्णा गावकर व मुलगा गणेश गावकर तसेच त्यांच्या समवेत माजी सरपंच श्री. रविंद्र म्हापसेकर, उपसरपंच संतोष कासकर हे देखील उपस्थित होते.

Exit mobile version