सावंतवाडी,दि.१४: येथील भाजपा कार्यालय येथे आंबोली मंडल च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.यावेळी आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर,अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री. चंद्रकांत जाधव, माजी आरोग्य सभापती आनंद नेवगी भिकाजी राऊळ,संतोष मेस्त्री,प्रशांत जाधव, विजय राणे आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.