सावंतवाडी,दि.१३: शहरातील स्वच्छतेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलच्या माध्यमातून सावंतवाडीचे मुख्याधिकारी श्री जावडेकर यांना निवेदन देण्यात आले.यावेळी अल्पसंख्यांचे जिल्हा उपाध्यक्ष, इफ्तिकार राजगुरू, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर ,सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस ,राकेश नेवगी आदी पदाधिकारी उपस्थित होते.