Site icon Kokandarshan

येत्या १५ दिवसात डॉक्टरांची सेवा न सुधारल्यास मनसेच्या वतीने तक्रारदार रुग्णांसह उपजिल्हा रुग्णालयात आंदोलन छेडणार..

मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांचा इशारा..

सावंतवाडी, दि.१२: येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येथील उपजिल्हा रुग्णालयात सेवा सुधारण्या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने प्रभारी अधीक्षक डॉ.संदीप सावंत यांची भेट घेतली व रुग्णांचे होणारे हाल व उपलब्ध नसलेल्या सोयीसुविधांबाबत सविस्तर चर्चा केली यादरम्यान मागील काही दिवसापासून मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे उपचार घेतलेल्या रुग्णांनी केलेल्या तक्रारी यासंदर्भात जाब विचारण्यात आला. तसेच फोन द्वारे डॉक्टर सावंत व रुग्ण यांचा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधून देत झालेल्या चुकीच्या उपचारांबाबत अधीक्षक श्री डॉ सावंत यांच्या आणून दिले निदर्शनास यावेळी म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर कार्याध्यक्ष संतोष भैरवकर माजी तालुका उपाध्यक्ष अतुल केसरकर शहर उपाध्यक्ष प्रवीण गवस निलेश देसाई आदी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान रुग्णालयातील विविध समस्यांबाबत अधीक्षक श्री सावंत यांच्याशी चर्चा करण्यात आली यानंतर अधीक्षक श्री सावंत यांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची बैठक लावून योग्य त्या सूचना दिल्या जातील असे आश्वासन मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. तसेच डॉक्टरांची सेवा १५ दिवसात न सुधारल्यास मनसेच्या वतीने तक्रारदार रुग्णांसह उपजिल्हा रुग्णालयात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक श्री डॉ सावंत यांना दिला.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version