Site icon Kokandarshan

निकृष्ट कामामुळेच मणेरी येथील तिलारी प्रकल्पाचा पोट कालवा फुटला.. युवा सेनेचा आरोप


दोडामार्ग,दि.११: कालव्यांच्या निकृष्ट कामामुळे वादात असलेला तिलारी प्रकल्पाचा आणखी एक कालवा फुटल्याने दोडामार्ग परिसरात खळबळ माजली आहे.निकृष्ट कामामुळेच मणेरी येथील तिलारी प्रकल्पाचा पोट कालवा फुटला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वीच या कालव्याची दुरुस्ती करण्यात आली होती. याप्रकरणी आपण जलसंपदा मंत्र्याकडे चौकशीची मागणी करणार असल्याचे युवासेनेचे तालुकाप्रमुख भगवान गवस यांनी सांगितले.
दोडामार्गा तालुक्यातील तिलारी येथील आंतरराज्य प्रकल्प पूर्ण होत आला असून काही कालव्याची कामे पूर्ण होणे बाकी आहेत असे असतानाच दरवर्षी एक दोन कालवे हे कुठे ना कुठे फुटत असल्याने या कालव्यांच्या दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उभा टाकला आहे गेल्या वर्षीच मोठा कालवा फुटून गोव्यासह महाराष्ट्राचे पाणीच बंद झाले होते.
त्यातच आता पुन्हा मणेरी येथील कालवा फुटल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे कालव्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात आली नसल्याने हे कालवे फुटत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे मणेरी येथील जो कालवा फुटला आहे.त्या कालव्याची चार दिवसापूर्वीच दुरुस्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र तरीही हा कालवा कुठल्या ने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान कालव्याचे काम ज्या ठेकेदाराने केले आहे ते काम निकृष्ट दर्जाचे असल्याने तो कालवा फुटल्याचे युवासैनिकचे गवस यांनी  सांगितले आहे.
या सगळ्याला तिलारी प्रकल्पाचे अधिकारी जबाबदार असून  त्यांच्यावर ही कारवाई व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.कालवा फुटल्याचे समजताच पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी जाऊन आले आहेत.मात्र अद्याप पर्यत कोणाती निर्णय घेण्यात आला नाही.

Exit mobile version