Site icon Kokandarshan

विशाल सेवा फाउंडेशन च्या वतीने शहरात ठीक ठिकाणी बहिर्वक्र अपघातरोधक आरशांचे लोकार्पण..

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून केलेले कार्य कौतुकास्पद..संजू परब

सावंवताडी,दि.१०: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा उद्योजक विशाल परब यांनी विशाल फाऊंडेशनच्या माध्यमातून सावंतवाडी तलावाकाठी अपघातरोधक बहिर्वक्र आरसा लावण्यात आला.
माजी नगराध्यक्ष संजू परब व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनोज नाईक यांच्याहस्ते याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अशाच पध्दतीने शहरात तब्बल वीस ठिकाणी हे आरसे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरात होणारे विशेषतः लहान मुलांचे अपघात कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास युवा नेते श्री. परब यांनी व्यक्त केला. तर अशा प्रकारचे अपघातरोधक आरसे शहरात बसविण्यात आल्यामुळे त्याचा फायदा नागरिकांना व वाहनचालकांना होणार आहे. त्यामुळे परब यांनी राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी यावेळी बोलताना काढले.

यावेळी युवा नेते विशाल परब, जीतू गावकर, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, विनोद सावंत, ओंकार पावसकर, तेजस माने, अनिल सावंत, विनोद सावंत आदी उपस्थित होते.

Exit mobile version