Site icon Kokandarshan

सह्याद्री पट्ट्यात सांगेली येथे वादळी वाऱ्यासह पाऊस..

रस्त्यावर झाडे पडल्याने दोन तास वाहतूक ठप्प…

सावंतवाडी,दि.०८ : हवामान खात्याने कोकणपट्ट्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता त्याप्रमाणे शनिवारी सायंकाळी सह्याद्रीच्या पट्ट्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे.सह्याद्री पटयात सांगेली, माडखोल, कलंबिस्त आदी गावांना या पावसाचा तडाखा बसला आहे.

काही गावात तर मुसळधार पाऊस आणि वादळी वारे यामुळे रस्त्यावर झाडेही कोसळून वाहतूक कोंडी झाली होती.
हवामान खात्याने विदर्भ मराठवाडा व कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज दोन दिवसापूर्वीच वर्तवला होता. त्याप्रमाणे शुक्रवारपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात काहि ठिकाणी दमट हवामान होते तर आंबोली चौकुळ परिसरात पाऊस कोसळला होता शनिवारी ही सकाळपासून हवामान दमट होतेच मात्र सायंकाळच्या सुमारास सावंतवाडी तालुक्यातील काही गावांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारे झाले या वादळी वाऱ्यांमुळे काही घरांचे नुकसानही झाले.
त्याशिवाय अनेक झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोंडी ही झाली होती. विशेषता सह्याद्रीच्या पट्ट्यात या वादळी वाऱ्याचा तडाखा बसला असून जोरदार पाऊस ही कोसळला आहे. सांगेली गावात तर जोरदार पावसासह रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती सांगेली कडे जाणा-या रस्त्यावर झाड कोसळल्याने दोन तास वाहतूक वाहतूक ठप्प होती ते झाड अखेर ग्रामस्थांच्या मदतीने बाजूला करण्यात आले.

या वादळी वाऱ्यात सह्याद्री पट्ट्यातील अनेक गावातील ग्रामस्थांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version