Site icon Kokandarshan

दाभोली ग्रामपंचायतच्या उपसरपंच व सदस्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश..

शिवसेना उद्धव ठाकरे गटास धक्का..

वेंगुर्ला,दि.२७ : येथील दाभोली ग्रामपंचायतच्या उपसरपंच व सदस्यांनी शिवसेना पक्षात राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला त्यामुळे वेंगुर्लेत शिवसेना उद्धव ठाकरे गटात जोरदार धक्का बसला आहे.

महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी संपर्क कार्यालयात वेंगुर्ले दाभोली ग्रामपंचायतच्या उपसरपंच फिल्सुअनिता फर्नांडिस यांच्या समवेत ग्रामपंचायत सदस्य सिसीलिया मास्करेनास, एकनाथ राऊत नरेश बोवलेकर, तमास डीसोझा व जॉन मेंडोसा, माजी पंचायत समिती सदस्य समाधान बांदवलकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी वेंगुर्ला शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सचिन वालावलकर ,माजी पंचायत समिती सभापती सुनील मोरजकर, कोचरा सरपंच योगेश तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी ,महिला जिल्हाप्रमुख एडवोकेट नीता सावंत, अनारोजीन लोबो, नारायण राणे आदि उपस्थित होते.

दाभोली ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच गावाच्या पर्यटन वाढीसाठी निधी कमी पडू देणार नाही सर्वांना बरोबर घेऊन दाभोली चा विकास केला जाईल असे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आश्वासन दिले सर्वांचे स्वागत सचिन वालावलकर यांनी केले तर आभार नितीन मांजरेकर यांनी मानले.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version