Site icon Kokandarshan

हयात दाखल्यांबाबत सावंतवाडी तहसीलदार अरुण उंडे यांचे लाभार्थ्यांना जाहीर आवाहन…

सावंतवाडी,दि.२५ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र.शासन निर्णय क्र. विसयो-२०२०/प्र.क्र.१००/विसयो दिनांक ०३/०५/२०२१ अन्वये दरवर्षी १ एप्रिल ते ३० जून, या कालावधीत संजय गांधी, श्रावणबाळ वृध्दापकाळ योजना, विधवा निवृत्तीवेतन योजना, दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनांतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी त्यांचे ज्या बँकेत अनुदान सुरु आहे, अशा बँक मॅनेजरकडे स्वत: हजर राहावे व ते हयात असल्याची नोंद बँक मॅनेजर यांनी घ्यायची आहे. त्यानुसार सावंतवाडी तालुक्यातील एकूण २९५८ लाभार्थी यांचे हयात दाखले संबंधित बँकांमध्ये पाठविणेत आलेले असून त्यावर दिनांक १ एप्रिल,२०२३ ते ३० जून,२०२३ पर्यंत लाभार्थी यांनी बँक मॅनेजरकडे स्वतः उपस्थित राहून हयात असल्याबाबत नोंद घ्यायची आहे, असे आवाहन तहसिलदार सावंतवाडी, संजय गांधी योजना पेन्शन विभाग यांचेमार्फत करण्यात येत आहे. तसेच सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाबाबतचा दाखला तहसिलदार कार्यालयास वरील कालावधीपर्यंत पाठवून द्यायचा आहे. असे आवाहन सावंतवाडी तहसीलदार अरुण उंडे यांनी केले आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version