खात्री करण्यासाठी स्वतः पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे घटना स्थळी दाखल..
सावंतवाडी,दि.१९ : साई मंदिरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे असा निनावी फोन सावंतवाडी पोलीस ठाण्यात आल्याने एकच खळबळ उडाली हा निनावी फोन वर बोलणारा लहान मुलगा आल्याचे पोलिसांचे म्हणणे असून खात्री करण्यासाठी स्वतः पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे हे सावंतवाडी माडखोल येथील साई मंदिर येथे जाऊन पाहणी केली तसेच स्थानिकांशी ही चर्चा केली.हा काल 112 नंबर वर आला होता.
रविवारी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक निनावी फोन आला त्या फोनवरून समोरून एकाने साई मंदिरात गॅसचा स्फोट झाला आहे. अशा प्रकारे सांगितले निनावी फोन नंतर पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली निनावी फोन करणाऱ्याने आपला कुठलाही नाव पत्ता दिला नव्हता त्यामुळे काही काळ पोलीस ही चक्राहून गेले मात्र खात्री करण्यासाठी स्वतः पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे हे दुपारी साई मंदिर येथे पोहोचले.
व त्यांनी तेथील परिस्थितीची पाहणी केली मात्र अशी कुठली घटना तेथे घडली नसल्याचे स्पष्ट झाले.तरीही पोलीसांनी पुजारी तसेच इतरांशी ही चर्चा केली.दरम्यान पोलीस या निनावी फोन ची चौकशी करत असल्याचे पोलीस निरीक्षक मेंगडे यांनी सांगितले.तसेच फोन वरून येणारा आवाज हा लहान मुलाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.