Site icon Kokandarshan

सावंतवाडी शहरात चार (४) नंबर शाळेजवळ कारची दुचाकीला धडक..

दुचाकीस्वार जखमी.. जखमीला केले रुग्णालयात दाखल..

सावंतवाडी, दि.१८: शहरातील खासकीलवाडा येथील प्राथमिक शाळा नंबर ४ जवळ आज दुपारच्या सुमारास चारचाकी आणि दुचाकी यांच्यामधे अपघात झाला.

येथील उतारावर चारचाकी गाडीची दुचाकीस्वाराला धडक बसून चारचाकी गाडी पलटी झाली . यात चारचाकीस्वाराला कोणतीही दुखापत झाली नाही.मात्र दुचाकीस्वाराच्या पायाला दुखापत झाली आहे. सदर दुचाकीस्वार हा परप्रांतीय गवंडी कामगार असून. त्याला उपचारासाठी तात्काळ येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version