Site icon Kokandarshan

साळगाव येथे सिंधुदुर्ग पोलिसांकडून तब्बल ७ लाखांचा गुटखा जप्त..

स्थानिक गुन्हा अन्वेषण च्या पथकाची कारवाई.. गुटख्यासह टेम्पो ताब्यात

सिंधुदुर्ग,दि.१७ : कुडाळ तालुक्यातील साळगाव येथे सिंधुदुर्ग पोलिसांकडून तब्बल ७ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तर ६ लाखाची गाडी मिळून एकुण १२ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बाबाजी विजय नाईक (४० रा. खासकीलवाडा-सावंतवाडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई शुक्रवारी सकाळी ६ वाजता करण्यात आली.
सावंतवाडीतील एक व्यक्ती टेम्पो मधून गुटखा वाहतूक करत असल्याची टिप स्थानिक गुन्हा अन्वेषण च्या टिम ला मिळाली होती.त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण ने महामार्गावर साळगाव पासून कुडाळ पर्यत सापळा रचला होता.त्याप्रमाणे टेम्पो येताच स्थानिक गुन्हा अन्वेषण च्या पथकाने टेम्पो सह चालकाला ताब्यात घेतले.त्यांच्याकडे साडेबारा लाखाचा मुद्देमाल आढळून आला.असून बाबाजी नाईक याला पोलीसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस हवालदार अनिल धुरी, प्रवीण वालावलकर, यशवंत आरमारकर, चंद्रहास नार्वेकर, प्रथमेश गावडे, गुरुनाथ कोयंडे, अमित पालकर यांनी केली आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version