Site icon Kokandarshan

आंबोली येथील आरोग्य मेळाव्यास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडी,दि.१५: तालुक्यातील आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सिंधू आरोग्य मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच सौ सावित्री पालेकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच सौ.सावित्री पालेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. रोहिणी गावडे, शशिकांत गावडे स्त्रीरोग तज्ञ डॉ. राजेश नवांगूळ,अस्तिरोग तज्ञ डॉ. निखिल अवधूत, डॉ. दीपक लादे, डॉ. वर्षा शिरोडकर तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ. जगदीश पाटील,डॉ.अमोल जेवरे, आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जाधव, डॉ. आदिती पाटकर, ग्रा.सदस्य काशीराम राऊत, आशा स्वयंसेविका तसेच शिबिराचे लाभार्थी,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
डॉ. राजेश नवांगुळ यांनी आरोग्य आणि स्वास्थ आणि डॉक्टर आणि तपासणी बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली. यावेळी ग्रामस्थांनी देखील मोठ्या प्रमाणात लोकांनी लाभ घेतला. जिल्हा परिषद फंड मधून हा मेळावा घेण्यात आला.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version