Site icon Kokandarshan

ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून महिला दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन..

सावंतवाडी,दि.०७: ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून महिला दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केला जाणार असून या महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेने विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
सुदर्शन सभागृह मळेवाड येथे दुपारी १ ते २ पाककला स्पर्धा,२ ते ३ हळदी कुंकू,या नंतर खेळ पैठणी व त्यानंतर संगीत खुर्ची,लिंबू चमचा व विविध फनी गेमचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या कार्यक्रमाचा व स्पर्धांचा गावातील महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत कडून करण्यात आले आहे.

Exit mobile version