Site icon Kokandarshan

कविवर्य केशवसुत यांच्या ‘तुतारी’ स्मारकाच्या ठिकाणी अवमानकारक वर्तन करणाऱ्या “त्या” युवकावर कारवाई करा…

कोमसाप ची नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस निरीक्षक मेंगडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..

सावंतवाडी,दि.०३ : सोशल मिडियावर झळकण्यासाठी मोती तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या कविवर्य केशवसुत यांच्या ‘तुतारी’ स्मारकाच्या ठिकाणी अवमानकारक वर्तन करून एका अज्ञात व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यातून कविवर्य केशवसुतांच्या स्मारकाचा अवमान करण्यात आला आहे याची गंभीर दखल कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने घेतली आहे.

सावंतवाडीकरांच्या वतीने तीव्र निषेध करत संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी व भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत याची दक्षता घ्यावी, अशी मागणी आज शुक्रवारी सावंतवाडी चे मुख्याधिकारी जयंत जावडेकर व पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्षॲड संतोष सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली आहे.
यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे सहसचिव राजू तावडे ॲड नकुल पारसेकर दीपक पटेकर रुपेश पाटील विनायक गावस श्री कुडतरकर आदि उपस्थित होते. यावेळी सदरचा सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहता ही घटना अत्यंत गंभीर आहे निश्चितपणे सावंतवाडी नगरपालिकेच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाईल असे आश्वासन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी दिले तर पोलीस निरीक्षक मेंगडे यांनी या घटनेची सायबर क्राईम द्वारे सखोल चौकशी करून संबंधिताला गजाआड केले जाईल असे आश्वासन दिले यावेळी शाखेचे अध्यक्ष ॲड सावंत यांनी सदर व्यक्ती ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच असावी कारण सदर व्यक्तीने जाणीवपूर्वक हे कृत्य केले आहे कारण सोशल मीडियावर व्हिडिओ आपल्या मित्रांकडे व्हायरल करून आपल्या कृत्याचे त्यांनी समर्थनच केले आहे त्यामुळे साहित्यिकांची अशी अवहेलना कोकण मराठी साहित्य परिषद आणि साहित्य प्रेमी कधीही खपवून घेणार नाहीत या घटनेने सुसंस्कृत साहित्यिक सामाजिक वारसा असलेल्या सावंतवाडी करानी या घटनेचा तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे सदर व्यक्ती चा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी व त्या व्यक्तीने सोशल मीडियावरच आपली जाहीर दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी कोमसाप ने निवेदनाद्वारे केली आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version