Site icon Kokandarshan

आकेरी किल्ला/भुईकोट स्वच्छता व संवर्धन मोहीम संपन्न..

दुर्ग मावळा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम..

सिंधुदुर्ग,दि.२८ : कुडाळ तालुक्यातील दुर्लक्षित अशा आकेरी भुईकोट किल्ल्याची
रविवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग मार्फत स्वच्छता संवर्धन मोहीम पूर्ण करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किल्ले काळाच्या उदरात नष्ट झाले असून काही किल्ल्यांचे अवशेष मात्र नावापुरते नाहीतर इतिहासाच्या पानातच उरले आहे. आकेरी किल्ला/भुईकोट याचेच एक उदाहरण म्हणजे कुडाळ तालुक्यात असलेला आकेरी किल्ला/भुईकोट आज केवळ अवशेष रुपात शिल्लक आहे. आकेरी किल्ल्याबद्दल परिसरातील लोकांना माहिती नाही असे म्हणायला काहीच हरकत नाही.

हा भुईकोट किल्ल्याबाबत सर्वांना माहिती व्हावी, त्याचे जतन व्हावे यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग तर्फे आयोजित केलेल्या स्वच्छता व संवर्धन मोहिमेंतर्गत आकेरी भुईकोट किल्ल्याचा बुरुज व छोटेखानी इमारतीच्या चौथऱ्याची सफाई करण्यात आली.

या मोहिमेत गणेश नाईक, पंकज गावडे,शिवाजी परब, सच्चिदानंद राऊळ, सुहास सावंत,संकेत सावंत,योगेश एरम, वैभव परब, अजिंक्य गोसावी, जालिंदर कदम, हेमांगी जोशी, डॉ संजीव लिंगायत, मयुरेश बागवे, गौरेश बागवे, संदेश गोसावी, अरुण म्हाडगूत,राजाराम कविटकर इत्यादींनी भाग घेतला.

या मोहिमेतील सहभागीना अल्पोपाहर व चहाची सोय प्रभाकर बागवे यांनी केली. तर या मोहिमेला श्री देव रामेश्वर देवस्थान समिती अध्यक्ष बाळकृष्ण राऊळ यांनी सहकार्य केले. सर्वांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version