Site icon Kokandarshan

शिरोडा बाजार पेठ येथे आग लागून नुकसान झालेल्या भागाची.. राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे परब यांच्याकडून पाहणी..

आपदग्रस्तांसाठी अर्चना फाउंडेशन कडून २५ हजाराची आर्थिक मदत..

सिंधुदुर्ग,दि.२७ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा अर्चना घारे फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ अर्चना घारे परब आणि माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी रविवारी शिरोडा बाजारपेठ येथे लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या आपतग्रस्तांची भेट घेऊन त्यांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली.

शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीत शिरोडा बाजारपेठेतील डॉक्टर सावगावकर यांच्या दवाखान्यासह पाच दुकाने जळाली होती. सौ.घारे परब व माजी मंत्री प्रवीण भोसले यांनी रविवारी या आपतग्रस्त ठिकाणी भेट देऊन या भागाची पाहणी केली.
दरम्यान डॉक्टर सावगावकर व अजित आरोंदेकर यांच्याशी चर्चा करून त्यानंतर माजी आमदार शंकर कांबळे यांच्या कार्यालयात रोख रक्कम पंचवीस हजार रुपये व्यापारी संघाचे उपाध्यक्ष राजन शिरोडकर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी माजी मंत्री प्रवीण भाई भोसले ,शंकर कांबळे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी माजी उपसभापती सिद्धेश रेगे, मयूर शिरोडकर, धाकोरे माजी सरपंच आदि उपस्थित होते.

Exit mobile version