वनविभागातील अधिकारीच बनले झारीतील शुक्राचार्य..
सावंतवाडी,दि.२७ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालकी क्षेत्राच्या नावाखाली लाखो रूपयांची वेतकाठी तोडली जात असून वनविभागातील काहि झारीतील शुक्राचार्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून मालकी प्रकरणे दाखवून वनसंज्ञेतील वेतकाठीची तोड करत आहेत यातून वनविभागाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत असून तो अधिकाऱ्याच्या घशात जात आहे.
याबाबत उपवनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी यांनी जर सर्व मालकी प्रकरणाची पडताळणी केल्यास लाखो रूपयांचा भ्रष्टाचार उघडकीस येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात वनहद्द असल्याने या जमिनी मध्ये वेतकाठी शिकेकाई तमालपत्री अशी वेगवेगळी उत्पादने येतात या सर्व उत्पादनाना बाजारात मोठी मागणी असून दरवर्षी ही उत्पादने वनविभाग निर्विदा पध्दतीने देत असतात तशी वेतकाठी ही दोन किंवा तीन वर्षानी निर्विदा पध्दतीने दिली जाते यातील अनेक मक्ते हे सोसायटीना ही दिले जात असतात या माध्यमातून वनविभागाला लाखो रूपयांचा महसूल प्राप्त होत असतो.
गेली अनेक वर्षांपासून असे मक्ते सोसायटीना दिले गेले असतनाच आता मात्र वनविभागातील काहि झारीतील शुक्राचार्य जागे झाले असून नव्या उपवनसंरक्षक यांना अंधारात ठेवून वेतकाठी ची काहि मालकी प्रकरणे तयार केली असून यातील अनेक मालकी प्रकरणे ही दोडामार्ग व कुडाळ तालुक्यात करण्यात आली आहेत.यात एखादे वनहददी जवळील मालकी प्रकरण करायचे आणि वनहददी तील सर्व वेतकाठी सह अन्य झाडे साफ करायची असाच काहिसा प्रकार सुरू करण्यात आला आहे.
यामध्ये तर कुडाळ तालुक्यातील शिवापूर सह अन्य गावा बरोबर दोडामार्ग तालुक्यातील आवाडे पासून पाल पाट्ये शिरंगे भागात ही वेतकाठी ची तोड मोठ्याप्रमाणात करण्यात आली आहे.सध्या उपवनसंरक्षक उपवनसंरक्षक हे नव्याने रूजू झाल्याने त्यांना अंधारात ठेवून हे सर्व प्रकार काहि अधिकारी करत असल्याची चर्चा वनविभागातच सुरू असून उपवनसंरक्षक यांना काहि अधिकारी गोड बोलून चुकीचे मार्गदर्शन करत असल्याचे ही सांगितले जात आहे.वेतकाठी तून शासनाला मिळणारा लाखो रूपयांचा महसूल परस्पर अधिकारी लाटत असले तर विचारणार कोणाला असा सवाल वन्यप्रेमी व्यक्त करीत आहेत.