Site icon Kokandarshan

संत सेना महाराज नाभिक माडखोल विभागाची नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर..

सावंतवाडी, दि.२४ : संत सेना महाराज नाभिक माडखोल विभागाची नवनिर्वाचित कार्यकारणी संत सेना नाभिक संघटना सावंतवाडी तालुका कमिटीच्या उपस्थितीत दि. २२ फेब्रुवारी २०२३ रोजी जाहीर करण्यात आली.नाभिक माडखोल विभागाची सभा पांडूरंग कारीवडेकर (कारीवडे) यांच्या घरी दुपारी ३.०० वाजता संपन्न झाली.

यावेळी तालुका अध्यक्ष नाभिक संघटना पदी सदानंद बाळा पवार, तालुका उपाध्यक्ष नाभिक संघटना सदानंद वसंत होडावडेकर,सल्लागार म्हणून हनुमंत कारीवडेकर, शांताराम वेतोरकर यांची नियुक्ती करण्यात आली.

महादेव पवार,समीर कवळेकर,प्रथमेश धारगलकर,नरेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारणी स्थापन करण्यात आली.

अध्यक्ष पांडुरंग विठ्ठल सकपाळ, उपाध्यक्ष संतोष रामा न्हावी, सचिव राजेंद्र सिताराम सावरवडकर, खजिनदार अजित अशोक होडावडेकर, सल्लागार वासुदेव होडावडेकर,सदस्य पांडूरंग कारिवडेकर,चेतन तोरस्कर,योगेश न्हावी,आनंद कारिवडेकर,संजय होडावडेकर, निलेश चव्हाण,विश्वनाथ होडावडेकर,संतोष सकपाळ,भरत सावरवाडकर,अमित न्हावी,साईनाथ होडावडेकर आदि उपस्थित होते.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version