Site icon Kokandarshan

सावंतवाडीच्या जनरल जगन्नाथराव भोसलेंची भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून दखल…

सुरेंद्र भोसलेंनी मानले आभार: त्यांचे जीवन नव्या पिढीसाठी आदर्श ठरणारे, लेखातून गौरव…

सावंतवाडी,दि.२३: आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने प्रसिध्द केलेल्या लेखामध्ये तत्कालीन आझाद हिंद सेनेेचे सेनापती तथा सावंतवाडीचे सुपुत्र मेजर जनरल जगन्नाथराव भोसले यांच्याबाबत लिखाण केले आहे. खरा नेता हा त्यांच्या चारित्र्याच्या प्रभावातून प्रेरणा देतो. भोसले हे त्या नेत्यांपैकी एक होते. त्यांचे जीवन अनेकांसाठी आदर्श ठरणारे आहे. त्यामुळे नव्या पिढीने त्याच्या विचाराचा बोध घ्यावा, असा गौरव त्यात करण्यात आला आहे. याबाबतची माहिती त्याचे नातेवाईक तथा आय. एन. ए. परिषदेचे अध्यक्ष सुरेंद्र भोसले यांनी दिली असून दखल घेणार्‍या केंद्र शासनाचे त्यांनी आभार मानले आहेत. तसेच त्यांची दखल घेवून समस्त जिल्हावासीयांचा सन्मान करण्यात आला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
याबाबत श्री. भोसले यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे. यात असे म्हटले आहे की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत श्री. जगन्नाथराव भोसले यांचा मोठा वाटा होता. त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यात आलेल्या लढाईत मोठा लढा दिला होता. त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांच्यावर हा लेख प्रकाशित करण्यात आला आहे.

Exit mobile version