Site icon Kokandarshan

वेंगुर्ल्यात भाजपा च्या वतीने संत गाडगे महाराज जयंती साजरी

वेंगुर्ले, दि.२३: आधुनिक काळातील महान संत व स्वच्छ भारताचे प्रणेते संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ले भाजपा तालुका कार्यालयात त्यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
वेंगुर्ले तालुका कार्यालयात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक व सरपंच , उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता , यावेळेस संत गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली .
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई व तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा संयोजक चंद्रकांत जाधव , जिल्हा उपाध्यक्ष अनंत आसोलकर , मच्छिमार सेलचे दादा केळुसकर , तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस , बुथ अध्यक्ष रवींद्र शिरसाठ व नारायण परब , आसोली सरपंच बाळा जाधव , गुरुप्रसाद चव्हाण , शेर्ले सरपंच प्रांजल जाधव , खानोली सरपंच प्रणाली खानोलकर , तरंदळे सरपंच सुशिल कदम , केसरी सरपंच स्नेहल कासले , जानवली सरपंच अजित पवार , माजी सरपंच श्रद्धा जाधव , वासुदेव जाधव , भिकाजी कदम , महेश चव्हाण , विष्णु दाभोलकर , प्रकाश कदम , वसंत खाजणेकर , गुणाजी जाधव , भुपेन चेंदवणकर , सोनिया मठकर , वर्षा आडेलकर , चंद्रकांत वालावलकर इत्यादी उपस्थित होते .

Exit mobile version