Site icon Kokandarshan

अवजड मशिनरी च्या आवाजामुळे रुग्ण आणि शेजाऱ्यांना होत आहे नाहक त्रास..

काम करण्याला आमचा कुठलाही आक्षेप नाही मात्र ज्या पद्धतीने काम सुरू आहे ते चुकीचे.. डॉ. जयेंद्र परुळेकर

सावंतवाडी,दि.२२ : आपल्या रूग्णालया शेजारी इमारतीचे जुने बांधकाम पाडण्यात येत असून त्यासाठी वापरण्यात येत असलेल्या अवजड मशिनरी च्या आवाजामुळे शेजाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या होणाऱ्या त्रासाची प्रशासनाने त्वरित दखल घेऊन हा आवाज थांबवावा अशी मागणी माजी नगरसेवक डाॅ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे. ते बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी लक्ष्मीकांत पणदुरकर उपस्थित होते.
डाॅ. परुळेकर म्हणाले, आपल्या रूग्णालया शेजारी आठ वर्षापुर्वी निवासी संकुल उभे करण्यात आले होते.मात्र तेथील संकुल आता हे पाडण्यात येत आहे.तेथे आता नव्याने सात मजली संकुल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या अस्तीत्वात असलेले बाधकाम जेसीबीला ड्रील मशिन लावुन पाडण्यात येत आहे.या आवाजामुळे रूग्णालयातील रुग्णाना तसेच आजुबाजुच्या रहीवाशाना त्रास होत आहे. तसेच नजिकच्या घरांनाही याचा धोका पोहचू शकतो,या होणाऱ्या त्रासाची प्रशासनाने त्वरित दखल घेऊन हा आवाज थांबवण्यात यावा अशी मागणी डाॅ.परुळेकर यांनी केली आहे.
काम करण्याला कुठलाही आक्षेप नाही मात्र ज्या पद्धतीने काम सुरू आहे ते चुकीचे आहे रुग्णांना आणि रहिवाशांना मोठ्या आवाजामुळे त्रास होत आहे ड्रिल मशीनमुळे आजूबाजूच्या इमारतीना तडे जाण्याची शक्यता आहे, या संदर्भात पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कळवले परंतु त्यांनी लक्ष दिले नाही अशा पद्धतीने सुरू असलेले काम तत्काळ थांबवणे आवश्यक आहे त्याऐवजी मनुष्यबळ वापरून ही इमारत पाडणे आवश्यक आहे अन्यथा ज्या पद्धतीने काम सुरू झाले आहे त्याचा त्रास आम्हाला आणखी महिनाभर सहन करावा लागणार आहे.
असे परूळेकर म्हणाले तसेच सध्या सुरु असलेले काम तत्काळ थांबवावे. यासंदर्भात नगरपरिषद वर प्रशासक असलेल्या प्रांताधिकारी यांचेही लक्ष वेधण्यात येणार आहे ही इमारत विद्यमान मंत्रीमंडळातील मंत्र्यांची आहे त्यांनी याबाबत लक्ष घालणे आवश्यक आहे. अन्यथा यासंदर्भात आम्हाला आवाज उठवावा लागेल. यावेळी उपस्थित असलेल्या लक्ष्मीकांत पणदुरकर यांनी आपण वृद्ध असल्यामुळे या आवाजाचा त्रास होत आहे हृदयाची धडधड होत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सुरू असलेले काम बंद करण्यात यावे अशी माझी मागणी आहे असे यावेळी पणदूरकर यांनी म्हटले आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version