Site icon Kokandarshan

माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले यांचा वाढदिवस सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उत्साहात साजरा..

यावेळी मान्यवरांनी दिल्या जुन्या आठवणींना उजाळा…

सावंतवाडी, दि.२०: तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले यांचा ७४ वा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व प्रवीण भाई मित्र मंडळ परिवाराकडून साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रवीण भाईंसोबत केलेले काम आणि लाभलेला सहवास आपल्या भाषणात व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब,माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, चंद्रकांत गावडे, शब्बीर मणियार, श्री वारंग, विनायक परब, सायली दुभाषी, दर्शना बाबर देसाई,सिद्धी परब,देविदास आडारकर, देवेंद्र टेमकर,हिंदुतुल्ला खान,पूजा दळवी, आदि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि मित्र मंडळ उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी ज्यावेळी प्रवीण भाई आमदार होते त्यावेळी आम्ही शिवसेनेत भाईंच्या विरोधात होतो. मात्र तरीपण त्यांची काम करण्याची पद्धत सर्व समावेशक स्वभाव यामुळे भाईंनी विरोधकांना पण आपलेसे करून घेतले.
यामुळे भविष्यात त्यांचं आदर्श नेत्यांच्या यादीमध्ये नाव घेतलं जाईल एवढं चांगलं काम त्यांच्याकडून झालं असे बोलत साळगावकर यांनी भोसले यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना अर्चना घारे परब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि प्रवीण भाईंचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल, त्यांच्या आशीर्वादाचा हात माझ्यावर सदैव राहू दे.. मी ज्यावेळी या मतदारसंघात आले त्यापूर्वी शरद पवार साहेबांनी अगोदर प्रवीण भाईंना भेटा असे सांगितले, त्यांच्या मार्गदर्शनाने मी आज या मतदारसंघात काम करत आहे अजित दादा पवार यांचे विश्वासू व चांगल्या चारित्र्याचे व्यक्तिमत्व असेही प्रवीण भाईंकडे पाहिले जाते. आजही तरुणांना लाजवेल अशी भाईंची काम करण्याची पद्धत आहे त्यांना भावी वाटचालीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी या वाढदिवसा दिनी शुभेच्छा देते अशा शब्दात सौ अर्चना घारे परब यांनी प्रवीण भाईंवर शब्दसुमनांचा वर्षाव केला.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version