Site icon Kokandarshan

शिरशिंगे ग्रामपंचायत सह गावात ठिक-ठिकाणी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा..

सावंतवाडी,दि.१९ : तालुक्यातील शिरशिंगे ग्रामपंचायत सह गावात ठिकठिकाणी शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
गावचे सरपंच दीपक राऊळ यांनी शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय भवानी जय शिवाजी अशा प्रकारच्या जय घोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

यावेळी उपसरपंच सचिन धोंड पोलीस पाटील गणू राऊळ, ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्य, आदि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version