Site icon Kokandarshan

तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्र व आपले सरकार यामध्ये मोठ्या प्रमाणात जनतेची आर्थिक लूट….

मनसे सावंतवाडी माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांचा आरोप..

सावंतवाडी,दि.१७: तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्र व आपले सरकार यामध्ये मोठ्या प्रमाणात जनतेची आर्थिक लूट होत आहे असा आरोप मनसे सावंतवाडी माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केला आहे. यासाठी सावंतवाडी तहसीलदार श्री अरुण उंडे यांना तालुकाध्यक्ष श्री. गवंडे यांनी निवेदन दिले.त्या निवेदन त्यांनी असं म्हटले यापूर्वी राबविलेले सेतू ही संकल्पना यशस्वी राबविल्याबद्दल ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी केवळ सेतूतील कामासाठी होणाऱ्या लोकांचा त्रास वाचावा यासाठी शासनाच्या महसूल विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील मोठ्या व ज्यादा लोकसंख्येच्या गावाच्या ठिकाणी शासनाच्या वतीने महा-ई-सेवा केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत.या सेवा केंद्रात सातबारा, फेरफार, उत्पन्न, अधिवास (डोमेसाईल) या व इतर स्वरूपाचे दाखले दिले जातात.ही योजना यशस्वी व्हावी याकरिता शासनाने मंडळ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने दाखले देण्यात मंडळ अधिकाऱ्यांना काही प्रमाणात अधिकार प्रदान केलेले आहेत.परंतु सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात असलेल्या सेतू कार्यालयात दर पत्रक तयार केलेले व त्याप्रमाणे रुपये आकारले जातात.व पावती दिली जाते, परंतु महा-ई-सेवा केंद्र नागरिकांकडून भरमसाठ रुपये घेतले जातात.अशा अनेक तक्रारी विद्यार्थ्यांच्या सर्व सामान्य जनतेच्या आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत.जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अटी शर्तीचे या ठिकाणी पालन केले जात नाही.प्रत्येक महा-ई-सेवा केंद्रात गणवेश घालणे बंधनकारक असताना आपल्या तहसीलदार कार्यालयामध्ये गणवेश परिधान न करता महा-ई-सेवा केंद्र वाले दाखले घेऊन जातात. काही नागरिक तर या महा-ई-सेवा केंद्राच्या मनमानी कारभार ला कंटाळलेले आहेत. यापुढे प्रत्येक महा-ई-सेवा केंद्रात घेतलेल्या दाखल्यांची पावती व दाखल्याचे दर पत्रक निश्चित करून महा-ई-सेवा केंद्रात देण्यात यावे. व प्रत्येक केंद्रात दिशादर्शक दर पत्रक लावले की नाही यासंदर्भात आपल्या मंडळ अधिकारी यांना अहवाल सादर करण्यास सांगावे आपणास ही निवेदन मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक महा-ई-सेवा केंद्रावर दरपत्रक न लावल्यास त्यांच्या परवाना तात्काळ माननीय जिल्हाधिकारी यांना कळवून रद्द करण्यात यावा. आपल्याकडून योग्य ती कार्यवाही होईल ही अपेक्षा असे लेखी निवेदन तहसीलदार श्री अरुण उंडे यांना देण्यात आले. यावेळी तहसीलदार आपलं म्हणणं योग्य असून मी माझ्या स्तरावर सर्व महा-ई-सेवा केंद्रास दर पत्रक लावण्याचा तात्काळ सूचना देईन असे आश्वासन गुरुदास गवंडे यांना देण्यात आले.

Exit mobile version