Site icon Kokandarshan

कलंबिस्त हनुमान दशावतार नाट्य मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान दशावतार नाट्य महोत्सव..

महाशिवरात्रोत्सवानिमित्त कलंबिस्त श्री लिंगेश्वर मंदिरात नाट्य महोत्सवाचे आयोजन

सावंतवाडी, दि.१६: तालुक्यातील कलंबिस्त गावात सातत्याने गेली अकरा वर्ष दशावतार नाट्य महोत्सव घेऊन हनुमान दशावतार नाट्यमंडाने दशावतार लोककला जिवंत ठेवण्याचे काम करीत आहे या मंडळाच्या माध्यमातून अनेक कलाकार निर्माण झाले आहेत हे कौतुकास्पद आहे ग्रामीण भागात सातत्याने एखादा महोत्सव भरविणे आणि तो यशस्वी करणे ही खरी समाजसेवा आहे असे मत सैनिक पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ यांनी प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून बोलताना स्पष्ट केले कलंबिस्त हनुमान दशावतार नाट्य मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने १६ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत महाशिवरात्रोत्सवानिमित्त कलंबिस्त श्री लिंगेश्वर मंदिरात दशावतार नाट्य महोत्सव आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाचे उद्घाटन सैनिक पतसंस्था चेअरमन बाबुराव कविटकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर सैनिक ,चंद्रकांत शिरसाठ ,सुभाष सावंत बाळकृष्ण देसाई, माजी सरपंच शरद नाईक, गावकर अनिल सावंत ,देवकर विष्णू सावंत ,भाई देसाई ,रमेश सावंत ,बाबू बिडये ,धोंडी सावंत ,विश्वजीत सावंत सखाराम सावंत, आनंत सावंत अंतोन रोड्रिक्स राजेश पास्ते ,कृष्णा सावंत,अजित कदम,चंदू राजगे ,भाई सावंत ,सुनील सावंत व सूत्रसंचालन प्रल्हाद तावडे तर आभार नरेंद्र बीडये यांनी मानले.

यावेळी मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. सुनिल राऊळ म्हणाले गेली अकरा वर्ष हनुमान दशावता नाट्य मंडळ हा नाट्यमहोत्सव घेऊन दशावतार ही लोक कला जोपासण्याचे काम करत आहे कविटकर म्हणाले रामभाऊ सावंत यांनी सुरू केलेले हे हनुमान दशावतात नाट्य मंडळ या मंडळातून अनेक दशावतार कलाकार घडले त्यांचं कार्य आजही पुढे नेण्याचं काम मंडळाचे अध्यक्ष सखाराम सावंत व त्यांचे सहकारी करताहेत हे कौतुकास्पद आहे असेच दरवर्षी दशावतार महोत्सव व्हावेत आमच्याकडून जे काय सहकार्य करता येईल ते नक्की करू असे त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version